Breaking News

नाशिक मनपा स्थायी सभापतीपदी महिलाराज


नाशिक, दि. 19, मार्च - नाशिक मनपात 27 वर्षाच्या इतिहासात स्थायी सभापती पदी महिला विराजमान झाली आहे. भाजपच्या हिमगौरी आहेर - आडके यानां मान मिळाला आहे. शिवसेनेच्या संगीता जाधव यांचा पराभव करुन हिमगौरी आहेर-आडके यांचा विजय झाला. त्यांना एकूण 9 मते तर संगीता जाधव यांना 6 मते पडली. तर मनसे पुरस्कृत अपक्ष नगरसेवक मुशीर सय्यद यांनी या निवडणुकीला पाठ फिरवली. त्यामुळे आता नाशिक महापालिका स्थायी सभापती पदी पहिल्यांदाच महिला राज दिसणार आहे.