Breaking News

भिवंडी-कल्याण मार्गावरील कारखान्याला आग; सामान जळून खाक

ठाणे, दि. 19, मार्च - भिवंडी-कल्याण मार्गावरील लाकडाच्या वखारीतील कारखान्याला आग लागल्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश मिळाले. सुदैवाने यात जिवीतहानी झाली नाही. मात्र यात सामान जळून खाक झाले.

कोन गावात लाकडाच्या वखारी मागील भागात लाकडाचा सोफा, पाळणे व इतर लाकडाच्या साहित्य बनविण्याचा कारखाना होता. हा कारखाना पत्र्याच्या शेडमध्ये सुरू होता. या कारखान्यात अनेक रसायने असल्यामुळे आगीचे प्रमाण वाढत गेले. त्यामुळे आसपासच्या नागरिकांनी घराबाहेर पळ काढला. 
भिवंडी-कल्याण मार्गावर लागलेल्या या आगीमुळे येथील परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. अग्निशमन दलास वाट देण्यासाठी येथील वाहतूक रोखण्यात आली होती. आग नियंत्रणात आल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. या प्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात जळीत म्हणून नोंद करण्यात आली आहे.