Breaking News

सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी वाचवले वयोवृद्धाचे प्राण


येथील जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य व सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी जामखेड बस स्थानकावर असलेल्या एका वयोवृद्ध भिकारीला स्वतः उचलून जामखेड ग्रामीण रुग्णालयात दाखल करून त्याच्यावर उपचार सुरू केले. त्याची अवस्था इतकी दयनीय होती की, जर त्यांना रुग्णालयात दाखल नसते केले तर त्यांचा बस स्थानकावर मृत्यू झाला असता, एवढी बिकट परिस्थिती त्या वयोवृद्धाची होती. अशी माहिती समजताच संजय कोठारी यांनी स्वतःची व्हॅन अ‍ॅबुल्सन घेऊन घटनास्थळी दाखल होऊन, त्यांनी सदर वयोवृद्ध इसमास पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.मागील आठ दहा दिवसांपासून बस स्थानकावर एक व्यक्ती (नाव माहीत नाही) अत्यंत दयनीय अवस्थेत पडला होता, त्याला मदत करायला कोणी ही तयार नव्हते. परंतू कोठारी यांनी त्याला अंघोळ घालून दवाखान्यात नेले व त्याच्यावर उपचार सुरू केले. कोठारी यांच्यावर सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.