Breaking News

गांधर्व महाविद्यालयाच्या तबला परिक्षेत स्वामी समर्थ संगीतालयाचे विद्यार्थी अव्वल


अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडल, मुंबई यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या तालवाद्य प्रकारातील तबला या परीक्षेत श्री स्वामी समर्थ संगीतालयाचे 4 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले असून या संगीतालयाने आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाकडून दरवर्षी या परीक्षांचे आयोजन केले जाते. पाईपलाईन रोडवरील श्रमिकनगर येथील श्री स्वामी समर्थ संगीतालयाच्या विद्यार्थ्यांनी यावर्षीही या परीक्षांमध्ये सहभाग घेवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन मोठे यश प्राप्त केले. संगीतालयातील विद्यार्थी प्रथमेश धर्माधिकारी, ओंकार मते, अनुराग सोनवणे यांनी तबला विषयातील मध्यमा प्रथम परिक्षेत यश मिळविले आहे. तर आदित्य न्यालपेल्ली याने प्रवेशिका प्रथम परीक्षेत प्रथम श्रेणी मिळवून यश मिळविले.