Breaking News

अध्यक्षस्थानी रियाज देशमुख यांची तर उपाध्यक्षपदी रहेमान इनामदार


राहुरी/तालुका प्रतिनिधी/- बारागाव नांदूर येथील सर्वधर्मियांचे एकतेचे प्रतिक असलेले चांदशहावली बाबा उर्स कमेटीच्या अध्यक्षस्थानी रियाज देशमुख यांची तर उपाध्यक्षपदी रहेमान इनामदार व सचिवपदी ईजाज सय्यद यांची निवड करण्यात आली. 

उर्स कमेटीच्या आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानी वाय.बी.देशमुख हे होते. यावेळी रफिक ईनामदार, सचिन कोहकडे, कासम इनामदार, इम्रान देशमुख, सिराज इनामदार, समीर पिरजादे, युसूफ इनामदार, राजू शेख, समीर पठाण, हिरामण शिंदे, रफीक शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मावळते अध्यक्ष सुलेमान पटेल, उपाध्यक्ष जाकीर पठाण यांचा कमेटीच्या सदस्यांनी सन्मान केला. सर्व धर्मियांना एकत्र ठेवत चांदशहावली बाबा यात्रोत्सव साजरा करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. मागील वर्षात जमाखर्च सादर केल्यानंतर कार्यक्रमासाठी योगदान देणार्‍या सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.