Breaking News

प्रवरा पॉलिटेक्निकचा प्रकल्प राज्यात अव्वल


मुंबई येथील महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या पॉलिटेक्निकच्या प्रकल्प निर्मिती राज्यस्तरीय स्पर्धेत प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पद्मश्री विखे पाटील पॉलिटेक्निकचा प्रकल्प राज्यात अव्वल ठरला. या प्रकल्पाला प्रथम क्रमांकाचे रूपये ७५ हजार रुपयांचे पारितोषिक व सन्मान चिन्ह प्राप्त झाले, अशी माहिती पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. मनोज परजणे यांनी दिली. 

दरवर्षीप्रमाणे राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्यावतीने निर्मितीद्वारे नवीन उपक्रम आणि प्रतिभा वाढविणे या उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व पॉलिटेक्निकच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या प्रकल्पाची (प्रोजेक्टची) राज्यस्तरीय स्पर्धा औरंगाबांद येथे नुकतीच घेण्यात आली. या स्पर्धेत पॉलिटेक्निकच्या ५५ विद्यार्थ्यांनी ६० प्रकल्प सादर केले होते.पद्मश्री विखे पाटील पॉलिटेक्निकच्यावतीने मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यानी ‘मिनी ट्रॅक्टर ड्रॉन चेक बेसीन फॉर्मर’ (छोटया ट्रॅक्टरच्या साहाय्याने गादी वाफे बनविण्याचे यंत्र) या स्पर्धेत सादर केले. या यंत्रास राज्यातील प्रथम क्रमांक प्राप्त झाला.

आयपीएस अधिकारी यशस्वी यादव, तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, उपसचिव डॉ. आनंद पवार, औरंगाबाद येथीस टूल टेकचे संचालक सुनील किरडक यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. या प्रकल्पाची पेटंटकरिता नोंद करण्यासाठी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे निवड झाली आहे.

सदर प्रकल्पाद्वारे शेती मशागतीसाठी वेळ, श्रम व खर्चात मोठी बचत होणार आहे. छोट्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने पीक लागवडीसाठी गादी वाफे तयार करण्याकरिता हे यंत्र उपयुक्त आहे. या प्रकल्पाची किमंत अतिशय वाजवी {अंदाजे ११ हजार रुपये} आहे. त्यामुळे सामान्य शेतकरी सहजरित्या ते खरेदी करु शकतात. अशा प्रकारच्या यंत्राची बाजारात ३५ हजार ते ४० हजार रुपये किमंत आहे. याशिवाय त्यात अनेक त्रुटीदेखील आहेत. मात्र वियार्थ्यांनी या सर्व त्रुटींचा विचार करुन सोयीचे व सहज वापरता येणारे यंत्र तयार केले आहे. दुस-यांदा विखे पॉलिटेक्निकला हा बहुमान प्राप्त झाला आहे. 

या प्रकल्पासाठी प्राचार्य एम. बी. परजणे, प्रा. राहुल नरवडे मेकॅनिकल विभागाचे सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले. अनिकेत निकम, कुणाल भाटे, हर्षद भालेराव, वैभव काळे, या विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प तयार केला. संस्थेचे अध्यक्ष व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या कल्पक नेतृत्वामुळे यासाठी सातत्याने प्रोत्साहन मिळत आहे. या यशाबद्दल संस्थेचे विश्वस्त अण्णासाहेब म्हस्के, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे, युवा नेते डॉ. सुजय विखे, संस्थेचे महासंचालक व माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे, सहसचिव भारत घोगरे, संचालक डॉ. हरिभाऊ आहेर आदींसह प्राचार्य, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी या धड्धपड्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.