महिलांनी तंत्रस्नेही होणे आवश्यक : चासकर
डिजिटल क्रांतीसोबत परस्परांशी संवाद साधण्यासाठी संमेलन हे चांगले माध्यम आहे. मात्र देश खऱ्या अर्थाने सक्षम होण्यासाठी महिलांनी तंत्रस्नेही होणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन भाऊसाहेब चासकर यांनी केले. राज्यस्तरिया उपक्रमशील शिक्षिका समुहाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या महिला तंत्रस्नेही संमेलन व आदर्श शिक्षका गुणगौरव पुरस्कार समारंभाप्रंसगी ते बोलत होते.
यावेळी राज्यातील उपक्रमशील तंत्रस्नेही शिक्षिकांना गौरवचिन्ह व प्रशिस्तपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी राहुरी तालुक्यातील वळण येथील संत गाडगे महाराज आश्रम शाळेतील शिक्षिका निलिमा चिंचकर यांना ‘सावित्रीच्या लेकी’ हा सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षिका समुहातील महिलांनीच महिलांसाठी आयोजित केलेले हे पहिले महिला तंत्रस्नेही संमेलन होते. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातुन तंत्रस्नेही महिला यामधे मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
यावेळी 'आम्ही लेकी सावित्रीच्या’ या महिला शिक्षिका विशेषांकाचे हस्ते प्रकाशन करण्यात आले. समुहाच्या ब्लॉगचे उदघाटनही याप्रसंगी करण्यात आले. यावेळी शैलजा दराडे, गटशिक्षण अधिकारी पुणे, प्रतिभा भराडे, कुमठे बिट सातारा, यांनी संमेलनास दुरध्वनीद्वारे उपस्थितांना संबोधित केले. यावेळी सुदाम साळंके यांनी मनोगत व्यक्त केले. सर्वश्री मधुकर माळी, अमोल हंकारे, पांडुरंग जाधव, शिवाजी नवाळे, प्रदीप चासकर, सचिन शेळके, सुदाम साळुंके, करुणा गावंडे, अपर्णा ढोरे, हेमलता देशमुख, अनुराधा जेवळीकर, वैशाली भामरे आदींसह राज्यभरातून अनेक उपक्रमशील तंत्रस्नेही शिक्षिका याप्रसंगी उपस्थित होत्या.