Breaking News

बाजार समितीमध्ये शेतकरी, कामगारांना मिळणार शुुद्ध पाणी


आपला माल विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीत घेऊन आल्यावर शेतकर्‍यांना व तेथील सर्व कामगारांना पिण्यासाठी शुध्द पाणी मिळावे, यासाठी फिल्टर पाणी व वजन काट्याचे उद्घाटन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते गूढीपाडव्यादिवशी करण्यात आले. ना. प्रा. राम शिंदे यांच्या प्रयत्नाने एमएसीपी योजनेंतर्गत इलेक्ट्रॉनिक वजनकाटा बसविण्यात आला आहे. तसेच भुसार यार्डमध्ये शेतकरी, व्यापारी, सर्व कामगार, यांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी बाजार समितीच्या आवारात आरो पॉइंट बसविण्यात आले. त्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौतम उतेकर, उपसभापती शरद भोरे, जि. प. सदस्य अनिल लोखंडे, सोमनाथ पाचरण, पं. स. सभापती सुभाष आव्हाड, नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात, उपनगराध्यक्ष महेश निमोणकर, नगरसेवक अमित चिंतामणी, बिभीषण धनवडे, मोहन पवार, राजेश वाव्हाळ, केशव वनवे, बाजार समितीचे संचालक संजय वराट, तुषार पवार, काकासाहेब गर्जे, महादेव डुचे, मकरंद काशिद, सुभाष जायभाय, करण ढवळे, अरुण महारनवर, त्रिंबक कुमटकर, बाजीराव भोंडवे, सागर सदाफुले, पृथ्वीराज वाळुंजकर, शीलाभाई शेख, तसेच बाजार समितीचे सचिव सय्यद वाहेदभाई, अशोक मुळे यांसह सर्व कर्मचारी व तालुक्यातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.