Breaking News

राऊत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे कर्जत येथे उद्घाटन

कर्जत येथील चंद्रभामा फाउंडेशनचे मेडिकल डायरेक्टर डॉ. रविंद्र राऊत व डॉ. अश्‍विनी राऊत यांच्या राऊत मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शुभारंभ झाला. समाजसेविका भामाबाई राऊत व चंद्रकांत राऊत यांच्या शुभहस्ते शुभारंभ संपन्न झाला. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमासाठी खा. दिलीप गांधी, खा. सदाशिव लोखंडे, मा. मंत्री शिवाजी कर्डीले, भाजपाचे ज्येष्ठ नेते नारायण मोरे, माजी जि. प. उपाध्यक्ष राजेंद्र फाळके, नगराध्यक्ष नामदेव राऊत, मेडिकल डायरेक्टर डॉ.रविंद्र राऊत, स्रीरोग तज्ञ डॉ. अश्‍विनी राऊत, डॉ.पुजा राऊत, सभापती पुष्पा शिंदे, मा. सभापती सुवर्णा राऊत, दयानंद महाराज कोरेगावकर, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, उपनगराध्यक्ष बापुसाहेब नेटके, शिवसेना नेते बळीराम यादव, उपसभापती प्रशांत बुद्धीवंत, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, बाळासाहेब साळुंके, माजी पं. स. सदस्य आण्णासाहेब मोरे, मिरजगावचे उपसरपंच अमृत लिंगडे, विनोद दळवी, राजेंद्र देशमुख, कृ. उ. बा. समितीचे सभापती श्रीधर पवार, उपसभापती प्रकाश शिंदे, कोरेगावचे सरपंच बापुराव शेळके, सरपंच विजय तोरडमल, डॉ. विलास काकडे, डॉ. मधुकर काळदाते, डॉ. संदीप काळदाते, डॉ. नितीन साळवे, डॉ. राम तोरडमल, डॉ. मधुकर कोपनर, राजेंद्र खेत्रे, सुर्यकांत मोरे, संपत बावडकर, महासंग्राम युवा मंचचे तालुकाध्यक्ष भारत मासाळ, स्वप्नील देसाई, बजरंग कदम, शहर प्रमुख रामदास हजारे, उपाध्यक्ष काकासाहेब अनारसे, गणेश पालवे, अजित अनारसे, भारत मासाळ, नगरसेवक सचिन सोनमाळी, अनिल गदादे, अमृत काळदाते, नितीन तोरडमल, वैभव शहा, सतिष समुद्र, गणेश क्षीरसागर, शरद म्हेत्रे, काका धांडे, महेश जगताप, नगरसेविका मनिषा सोनमाळी, उषा राऊत, कांचन खेत्रे, मनिषा वडे, तालुक्यातील डॉक्टर, नगरसेवक आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविकातून डॉ. अश्‍विनी राऊत यांनी मेडिकल प्रोजेक्टच्या माध्यमातून आपली स्वप्नपुर्ती होत असल्याची भावना व्यक्त केली. कुटूंबातील सासू-सासरे, पती, सर्व सदस्य आणि विशेषतः नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी खंबीरपणे साथ दिल्यानेच या प्रकल्पाची उभारणी करता आली. खा. दिलिप गांधी, शिवाजी कर्डिले, डॉ. रविंद्र राऊत, डॉ. पुजा राऊत, डॉ. विलास काकडे, राजेंद्र फाळके आदी मान्यवरांनी प्रकल्पाला शुभेच्छा देत मनोगते व्यक्त केली. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी राऊत मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल हे ग्रामीण भागात अद्ययावत सुविधा देणारे केंद्र असुन रुग्णांसाठी संजीवनी ठरणार असल्याचा विश्‍वास व्यक्त केला. राऊत कुटुंबाकडे दुरदृष्टी असुन लोकांची गरज ओळखून त्यांनी येथे आयसीयु, डायलिसिस, अ‍ॅक्सिडेंट विभाग अशा सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्याचा परिसरातील जनतेला फायदा होणार असल्याचे पालकमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पत्रकार निलेश दिवटे, किर्ती खेडकर यांनी केले. डॉ. मधुकर काळदाते यांनी आभार मानले.