Breaking News

अवकाळी पावसाने आंबा, काजू पिक संकटात

सिंधुदुर्गनगरी - गडगडाटासह वैभववाडी तालुक्यातील सहयाद्री पट्टयातील गावांमध्ये बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास काही ठिकाणी गारपिटीसह जोरदार पाऊस कोसळला. दोडामार्ग व साटेली-भेडशी परिसर तसेच कुडाळ, पाट परिसरातही शिडकावा झाला. दरम्यान आज सुद्धा दिवसभर सिंधुदुर्ग जिल्ह्यात वातावरण ढगाळच होत. दिवसभर सूर्यदर्शन सुद्धा झाल नाही. हा पाऊस आणि हे वातावरण आंबा, काजू पिकासाठी धोकादायक असल्याने बागायतदरांमध्ये भीतीचे वातावरण आहे.


अचानक आलेल्या पावसामुळे आधीच चिंतेत असलेला आंबा, काजू बागायतदार धास्तावला आहे. वैभववाडी तालुक्यातील आखवणे-भोम, भुईबावडा, ऐनारी भागात गडगडाट, गारपिटीसह पाऊस झाला. करुळ, नावळे, सडुरे, अरुळे, सांगुळवाडी व वैभववाडी शहरातही पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसामुळे व्यापारी व ग्राहकांची तारांबळ उडाली. आंबा, काजू बागायतदारांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. गेले आठ दिवस वातावरणात बदल झाला असून उष्णतेचे प्रमाणही वाढले आहे. आंबा, काजूचा मोहोर करपून गेल्याचे शेतकरी सांगत आहेत. सडुरे, अरुळे, नापणे, सांगुळवाडी येथे रस्त्यांचे काम सुरू आहे. पावसाने रस्त्यावर माती, चिखल आल्याने रस्ते पूर्णपणे बंद होते. काही ठिकाणी वाहने रुतण्याच्याही घटना घडल्या.
दोडामार्ग व साटेली-भेडशी परिसरात बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पावसाचा शिडकावा झाला. तालुक्मयात सकाळपासूनच दमट वातावरण होते. त्यामुळे वातावरणात प्रचंड उष्मा होता. सायंकाळपर्यंत पाऊस पडेल, अशी अपेक्षा होती. सायंकाळी दोडामार्ग, साटेली-भेडशी परिसरात पावसाचा शिडकावा झाला. सकाळपासून असणारे दमट हवामान पाहता यंदा काजू उत्पादन खूप क मी होण्याची शक्यता आहे.