Breaking News

शैलेश नेर्लीकरांचे निधन

कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू, अशी ख्याती असलेले दिव्यांग बुद्धिबळपटू शैलेश मधुकर नेर्लीकर यांचे रविवारी रात्री साडेदहा वाजता निधन झाले. शरीराला 100 टक्के दिव्यांगत्वामुळे अक्षरशः जमीन समांतर झोपून जिद्दीने त्यांनी बुद्धिबळ खेळून देशाचे नाव सातासमुद्रा पार पोहोचवले. मात्र ग्रँडमास्टर होण्याचे स्वप्न त्यांचे अधुरेच राहिले.

शैलेश नेर्लीकर यांचा 21 मे 1977 रोजी जन्म झाला. कोल्हापूर जिल्ह्यातील नेर्ली येथे ते राहत होते. रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ते टिव्ही पाहत बसले होते. अचानक त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने त्याची प्राणज्योत मालवली. त्यांनी आपल्या तेवीस वर्षांच्या कारकिर्दीत तीन आंतरराष्ट्रीय, 8 ते 10 राष्ट्रीय व शेकडो  राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय स्पर्धा खेळून त्यांनी बुद्धिबळ क्षेत्रात नाव कमविले होते.