Breaking News

इंडिगोची 47 उड्डाणे रद्द, डीजीसीएचा दणका

नवी दिल्ली : इंडिगो एअरलाइन्सला आज 47 उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. यामुळे अनेक प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला. नागरी विमान उड्डाण महासंचालनालयाच्या (डीजीसीए) आदेशानुसार इंडिगोच्या 8, ए-320 निओ विमानांच्या उड्डाणावर बंदी घालण्यात आली आहे. तर गोएयरच्याही 3 विमानांवर उड्डाणासाठी बंदी घालण्यात आली आहे. आता या विमानांना उड्डाण करता येणार नाही. 

कारण महासंचालनालयाने या विमानांच्या इंजिनमध्ये दोष असल्याचे म्हटले आहे. महासंचालनालयाच्या या निर्णयामुळे इंडिगोला 13 मार्चला आपल्या स्थानिक नेटवर्कमध्ये साधारणपणे 47 विमाने रद्द करावी लागली आहे. विमानन कंपनीने याची माहिती आपल्या वेबसाइटवर दिली आहे. दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, बंगळुरू, पाटणा, श्रीनगर, भुवनेश्‍वर, अमृतसर आणि गुवाहाटीसह अनेक शहरांमधून जाणार्‍या आणि येणार्‍या विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले आहे. सोमवारी उड्डाणाच्यावेळी इंजन खराब झाल्याने लखनौला जात असलेल्या इंडिगोच्या एका विमानाला साधारणपणे 40 मिनिटांतच अहमदाबादला वापस जावे लागले होते. यावेळी विमानाच्या मिड-एअर इंजनमध्ये खराबी झाली होती. यानंतर डीजीसीएने हा निर्णय घेतला आहे. डीजीसीएने इंडिगोच्या ए-320 निओ प्रकारची 8 विमाने थांबवली आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेतल्याचे सांगत डीजीसीएच्या संचालकांनी 12 मार्चला ए-320 निओ विमानांसंदर्भात हा आदेश दिला आहे.