Breaking News

मंत्रालयातील उंदरांच्या नायनाटासाठी ३ लाख १९ हजार ४०० गोळ्या.

मंत्रालयाच्या इमारतीतील उंदरांच्या नायनाटासाठी काढण्यात आलेल्या निविदेबाबत राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेली माहिती पुढीलप्रमाणे आहे.मंत्रालय आणि सभोवतालच्या ॲनेक्स इमारतीमध्ये उंदीर मारण्यासाठी एकूण दोन निविदा काढण्यात आल्या. दोन्ही निविदा 3 मे 2016 रोजी मे. विनायक मजूर सहकारी संस्था मर्यादित यांना देण्यात आल्या. या दोन निविदांप्रमाणे 3,19,400 इतक्या संख्येने गोळ्या पुरविण्यात आल्या, (उंदीर मारण्यासाठी). माहितीच्या अधिकारात दिलेल्या उत्तरात सुद्धा हेच नमूद आहे. त्यामुळे 3,19,400 उंदीर मारणे असा त्याचा अर्थ नाही. या एका गोळीची किंमत 1.50 रुपये (दीड रुपये) इतकी असून या संपूर्ण कामासाठी 4,79,100 इतके रुपये खर्च करण्यात आले. 2010-11 आणि 2011-12 मध्ये सुद्धा दीड रुपये प्रतिगोळी याच दराने असे कंत्राट देण्यात आले होते.