Breaking News

पटसंख्या जास्त असलेल्या तुकड्यांवरील शिक्षकांना अनुदान देण्याबाबत शासन सकारात्मक - विनोद तावडे

मुंबई, : अनुदानित शाळांमधील वाढीव तुकड्यांबाबत अनुदान देण्यासाठी सुधारित शासन निर्णय घेण्यात येणार असून 100 टक्के अनुदान असलेल्या शाळेतील पटसंख्या अधिक आहे अशा अतिरिक्त तुकड्यांवरील शिक्षकांना अनुदान देण्याबाबत शासन सकारात्मक आहे असे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितले.उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सदस्य सर्वश्री नागोराव गाणार, विक्रम काळे, कपिल पाटील आदींनी प्रश्न उपस्थित केला होता.