Breaking News

‘जल्लोष चिमुकल्यांचा’ ठरला पालकांसाठी आनंदायी


बालगोपाळांच्या कलागुणांना संधी मिळावी, हा उद्देश डोळय़ासमोर ठेवून दुर्गापूरच्या जिल्हा परिषद शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम मोठय़ा उत्साहात संपन्न झाला. ‘जल्लोष चिमुकल्यांचा अविष्कार कलागुणांचा’ हे घोषवाक्य घेऊन हा कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम दुर्गापूरवासियांसह पालकांसाठी आनंदायी ठरला.
जात्यावरच्या ओव्या, पोवाडा, देशभक्तीपर गीते आणि बडबड गीतांबरोवर मराठी संकृतीचा जागर करत इयत्ता पहीली ते चौथीच्या बालगोपाळांनी तब्बल पाच तास आपल्या कलागुणांनी उपस्थित सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. ‘आम्ही मराठी शाळेची मुले कमी नाही’ हाच संदेश या चिमुकल्यांच्या सांकृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून दिला. पारंपरिक गीतांसह आजच्या आधुनिक रिमिक्स आपल्या अविष्कारतून आम्हाला व्यासपीठ द्या, ‘आम्ही पण लय लय भारी’ आहोत, हे दाखवून दिले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे यांच्या संकल्पनेतून होणारे आनंद बाजार आणि ‘जल्लोष चिमुकल्यांचा’ हे कार्यक्रम बालगोपाळांसह पालकांसाठी मन परिवर्तन करणारा ठरला. 

दुर्गापूरच्या प्राथमिक शाळेच्या चिमुकल्यांचा अविष्कार पाहण्यासाठी राहाता पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर वाकचौरे, पंचायत समितीच्या सदस्या नंदा तांबे, प्रवरा सहकारी बँकेचे संचालक छगनराव पुलाटे, केंद्रप्रमुख निंबाळकर, दाढ बुद्रुकचे माजी सरपंच गोरक्षनाथ तांबे, मच्छिंद्र जाधव, दुर्गापूरच्या सरपंच सुनीता गाडगे, उपसरपंच दमयंती पुलाटे, पोलीस पाटील दिलीप पुलाटे, वेणूनाथ मनकर, विठ्ठल पुलाटे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अशोक बोर्डे, सादिक अली मनियार, वैशाली भूतकर, माजी सरपंच जयश्री पुलाटे आदींसह पालक आणि ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.