प्रवरा महाविद्यालयात सावित्रीबाई फुलेंना अभिवादन
याप्रसंगी प्रा. सुजाता गुंजाळ यांनी सावित्रीबाई फुले यांचा जीवन परिचय विद्यार्थ्यांना करुन दिला. प्रा. भाऊसाहेब घोरपडे यांनी सावित्रीबाईंच्या कार्याची सखोल माहिती विद्यार्थ्यांना दिली. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे, प्रा. अमोल सावंत, प्रा. निलेश सोनुने, प्रा. अभंग, प्रा. मनिषा आदिक, प्रा. स्नेहल कडू, प्रा. घाडगे आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. प्रविण गायकर आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वयंसेवक ऋतुजा भालेराव हिने केले. सायली ढेरंगे हिने आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वयंसेवक विक्रमसिंह पासले, रघुनंदन चौधरी, अक्षय आहेर यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाच्या शेवटी काँग्रेसचे जेष्ठ नेते पतंगराव कदम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.