राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत डॉ. फरीदा मिर्झा यांची निवड
संगमनेर/प्रतिनिधी - नवीदिल्ली येथे पार पडणाऱ्या राष्ट्रीय 'मिसेस इंडिया क्वीन ऑफ सबस्टेन्स' या सौंदर्य स्पर्धेत येथील डॉ. फरीदा मिर्झा यांची अंतिम ४० स्पर्धकांमध्ये निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी देशभरातून महिलांनी सहभाग घेतला असून त्यांची ऑनलाईन पद्धतीने निवड करण्यात आली होती.''मिसेस इंडिया क्वीन ऑफ सबस्टेन्स' स्पर्धेत दि. १० एप्रिल पासून पाच चाचणी फेऱ्या होणार आहेत. अंतिमफेरी दि. १३ एप्रिल रोजी होणार असल्याचे डॉ. मिर्झा यांनी ‘दैनिक लोकमंथन’शी बोलताना सांगितले.
पुण्यात जन्मलेल्या डॉ. मिर्झा या वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेतल्यानंतर गेल्या १७ वर्षांपासून संगमनेर, अकोले या ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा पुरवत आहेत. लहानपणापासून उराशी बाळगलेले स्वप्न पूर्णत्वास जात असल्याचा त्यांना आनंद आहे. वैद्यकीय क्षेत्रात असूनही त्यांनी त्यांची आवड शिताफीने जोपासली आहे. डॉ. मिर्झा त्यांच्या कारकिर्दीचा त्यांच्या कुटुंबियांना अभिमान आहे. नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्यासह संगमनेरातील नागरिकांनी त्यांना या स्पर्धेतील यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. विविध गुणप्रदर्शनाबरोबरच संपूर्ण देशातून त्यांच्या फेसबुकवरील फोटोला मिळणाऱ्या लाईक, कमेंट व शेअर यावरदेखील स्पर्धा जिंकण्यास मदत होणार आहे. त्यामुळे सर्वांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून त्यांच्या फेसबुक पेजवर लाईक, कमेंट व शेअर करावी, असे आवाहन डॉ. मिर्झा यांनी केले आहे.