Breaking News

मंडलाधिकारी वाघमारेंना निलंबित करा तालुकाध्यक्ष टेके यांची मागणी

कोपरगाव /प्रतिनिधी - श्रीगोंदा येथील महसूल मंडलधिकारी निलेश वाघमारे यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करावी. तेथे कार्यरत असलेल्या तहसीलदारांचीही अवैध गौणखनिज तसेच वाळू उपशाची चौकशी करा. मंडलाधिकारी वाघमारेंना तात्काळ अटक करा अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटनेचे कोपरगाव तालुकाध्यक्ष रोहित म. टेके पाटील यांनी केली आहे. 

महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष पवन वानखेडे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे, किरण शिंदे, अनिल कोळसे, राजेंद्र भुजबळ, शहराध्यक्ष भारत पवार, संतोष जाधव, दिपक खोसे, जनार्दन जगताप, रामेश्वर आरगडे, राजेंद्र देसाई, देविदास चौरे आदींच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक प्रशासनास निवेदन देण्यात आले. 

यासंदर्भात कोपरगावच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. दि.१४ रोजी श्रीगोंदा येथील पत्रकार मच्छिंद्र सुद्रीक यांनी अवैध गौण खनिज तसेच वाळू उपसा निवेदनाची बातमी प्रसिध्द केली होती. याचा मनात राग धरून मंडलधिकारी वाघमारे यांनी पत्रकार सुद्रीक यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याचा निषेध यावेळी कोपरगाव येथे करण्यात आला.

यावेळी जिल्हा संघटक जनार्दन जगताप, तालुकाध्यक्ष रोहित म. टेके पा., कार्याध्यक्ष् संजय भवर, गणेश दाणे, काकासाहेब खर्डे, सतिष जाधव, विनोद जवरे, विष्णु सुंबे जालिंदर बढे, अरविंद कासार, संजय साबळे, महेश नाईक, राहुल निकम, श्रीकांत नरोडे, दत्तात्रय गायकवाड आदी पत्रकार व छायाचित्रकार उपस्थित होते.