Breaking News

शिवजयंती निमित्त वाघवाडीत विविध कार्यक्रमांचे आयोजन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने नगर तालुक्यातील वाघवाडी येथे शिवसेना शाखा व वाघवाडी ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवसैनिक कैलास वाघ यांनी दिली.


रविवार दि. 4 मार्च रोजी तीथीप्रमाणे येणार्‍या शिवजयंती निमित्त वाघवाडी येथे शिवरायांच्या येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पन करुन मानवंदना देवून कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. यानंतर सकाळी सवाद्य मिरवणूक होवून सायंकाळी 7 वा. शिवरायांच्या जीवनावर आधारीत पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न होणार आहे वारकरी महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष शिवशाहिर यशवंत महाराज फाले हे आपल्या बाणेदार शैलीतून सदर पोवाडा सादर करणार आहेत. समाजप्रबोधनात्मक पोवाड्यातून शिवरायांच्या ऐतिहासिक कामगीरीचे दर्शन उपस्थितांना होणार असल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी अबालवृद्धांसह कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसैनिक कैलास वाघ, ग्रामपंचायत सदस्य एकनाथ वाघ, साहेबराव वाघ, नानासाहेब धनवळे, जालिंदर ससे, परसराम घोरपडे, ज्ञानदेव विटकर, जगन्नाथ वाघ, अण्णा शिंदे यांचेसह वाघवाडी शिवसेना शाखा व समस्त ग्रामस्थांनी केले आहे.