शेती, शिक्षक व संशोधक हे क्रियाशिल कार्य - पद्मश्री डॉ. शरद काळे
देशभर फिरुन जेवढे विज्ञान शिकलो नाही, तेवढे विज्ञान आईने शिकविले. सर्वांचा एकच धर्म आहे. तो म्हणजे मानव. जात स्त्री-पुरुष आहे. हे सर्वांनी लक्षात घेतले तर समाजातील सर्व वाद दूर होतील. कुठल्याही क्षेत्रात कार्य करण्यापेक्षा शेती, शिक्षक व संशोधन हे कार्य अतिशय क्रियाशिल आहे. सध्याच्या युगातील युवा पिढीमध्ये हे कार्य करण्याची आवड नाही. यामुळे पुढील पिढीच्या आयुष्याची चिंता वाटते, असे मत पद्मश्री डॉ.शरद काळे यांनी व्यक्त केले.
न्यू आर्टस् कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयातील सायन्स असोसिएशनच्यावतीने विज्ञान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. शरद काळे बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ. बी.एच. झावरे, उपप्राचार्य ए.के. पंधरकर, डॉ. एस.बी. गायकवाड आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस लक्ष्मीपूजन व डॉ. चंद्रशेखर व्यंकटेशनरमण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दिपप्रज्वलनाने सुरुवात झाली. यावेळी विज्ञान दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धेचे मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.
पुढे बोलतांना डॉ. शरद काळे म्हणाले, या देशाच्या दिवसाची सुरुवात कचरा बाहेर काढण्यापासून होते. कचरा घरातून बाहेर जात असतांना निसर्गात प्रदुषण तयार करत आहे. 40 टक्के अन्नाचा कचरा आपल्या देशात आहे. तर आपला देश कसा? हा प्रश्न विचारला. घरातील कचर्याचे जर सेंद्रीय खते तयार केले तर देश अतिशय विकसित होवू शकतो. यावेळी डॉ. शरद काळे यांनी विद्यार्थी व शिक्षक यांच्याकडून अन्न पदार्थ वाया घालणार नाही, प्लॅस्टीकची पिशवी वापरणार नाही. प्रत्येक व्यक्ती कमीत कमी तीन झाडे लावून त्याची जोपासणा करतील, अशी शपथ घेतली.
कार्यक्रमाचे प्रास्तविक प्राचार्य डॉ. बी.एच. झावरे यांनी केले तर अहवाल वाचन डॉ.एस.बी. गायकवाड यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. गिरिष कुकरेजा यांनी करुन दिला तर आभार प्रा. महेश आहेर यांनी मानले.