Breaking News

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव

ग्रामीण भागातील जिल्हा परिषद व वाड़्या वस्तीवरील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचा कलागुण मनाला प्रसन्न करतो. या मुलांमधील कलेला स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून वाव देण्याचा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद उपाध्यक्षा राजश्रीताई घुले यांनी केले.

शेवगाव तालुक्यातील भायगांव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित स्नेहसंमेलनात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भायगांवचे सरपंच हरीभाऊ दुकळे, भाजपाचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब पाटेकर, जि. प. सदस्य रामभाऊ साळवे, तालुका शिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे, नगरसेवक कमलेश गांधी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना घुले म्हणाल्या की, केवळ पुस्तकी ज्ञानापेक्षा विद्यार्थ्यांच्या सर्वागीन विकासाकड़े शिक्षकांसह पालकांनी देखील लक्ष देणे ही काळाची गरज आहे. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी बेटी बचाव बेटी पढाव यांसह विविध कलादर्शनाने उपस्थितांचे मन जिंकले. संकेत दुकळे या विद्यार्थ्याने सादर केलेल्या छञपती शिवाजी महाराजांच्या चरित्र पोवाड़ंयाचे गायनाने परिसर दुमदुमून गेला. यावेळी अ‍ॅड़ सागर चव्हाण, राजेंद्र आढाव, रविंद्र उगलमुगले, देवटाकळीच्या नुतन सरपंच आनिता खरड़, आर. आर. माने, माजी सरपंच सर्जेराव दुकळे, रामनाथ आढाव, शेषराव दुकळे, अशोक दुकळे, भिमराज सागड़े, अशोक मेरड़, अजय माने, शहाराम आगळे, आण्णासाहेब ज-हाड़, रमेश दुकळे, कृष्णा चव्हाण, आण्णासाहेब दुकळे, बबन सौदागर, अशोक देशपांडे, ड़ॉ. परवेझ सय्यद, विठ्ठल आढाव, प्रवीण लांड़े, आण्णासाहेब नेव्हल, कारभारी दिवटे, राजेंद्र दुकळे, मुक्ताजी आढाव, मधुकर सौदागर, रमेश आढाव, आप्पासाहेब सौदागर यांच्यासह परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुखदेव शिंदे तर आभार आंबादास रूईकर यांनी मानले.