Breaking News

विषाल सोनवनेची ज्यूनियर इंजिनियर पदी नियुक्ती

तालुक्यातील टाकळी कडेवळीत गावात राहणार्‍या कैलास सोनवणे यांच्या ज्येष्ठ मुलाची भारतीय सैन्य दलात ज्युनियर इंजिनिअर पदावर नियुक्ती झाल्याने परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत गावातील कैलास हरीभाऊ सोनवणे यांना दोन मुले, परस्थिती हालकीची असल्यामुळे गावात पान टपरी पासून किराणा दुकान याच्यासह लॉन्ड्री यासारखे अनेक छोटे मोठे व्यवसाय चालवून आपली उपजीविका करत कैलास सोनवणे यांनी व त्याचे बंधू सुदाम सोनवणे व बाळासाहेब सोनवणे हे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असल्याने त्यांचीही मोलाची साथ लाभून मिळाली. त्यामुळेच अतिशय जिद्दीने आणि चिकाटीने केलेल्या प्रयत्नाला यश आले असून नुकत्याच झालेला स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षेत त्यांचा मुलगा विशाल सोनवणे हे केंद्रात उत्तीर्ण झाल्याने लवकरच ते भारतीय सैन्य दलात ज्युनियर इंजिनिअर पदावर कार्यरत होणार आहेत. गावांतील बाबासाहेब इथापे, गुलाब वाळुंज, सुभाष देशमुख, सुदाम नवले, सुरेश वाळुंज, विठ्ठल वाळुंज, परशुराम सोनवणे, सुरेश वाळुंज, दादा सोनवणे, बाळासाहेब खामकर, पांडुरंग रणसिंग, भानुदास खामकर, राजेंद्र खामकर, अंकुश नवले आदी मान्यवरांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.