Breaking News

स्वतःची तुलना स्वतःशीच करा ः डॉ. विदया गारगोटे

सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठ पुणे पदवी ग्रहण सोहळा अतिशय उत्साहात पारनेर महाविदयालयात संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे येथील वित्त व लेखा अधिकारी डॉ. विदया गारगोटे, सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाचे अधिसभा सदस्य प्राचार्य डॉ. संजय चाकणे हे मान्यवर उपस्थित होते.



दीक्षांत भाषण करताना विद्या गारगोटे म्हणाल्या, की, विद्यार्थ्यांनी स्वतःची तुलना स्वतः बरोबर करावी. कालच्यापेक्षा मी आज कुठे आहे हे तपासून पहावे, आत्मविश्‍वास व इच्छाशक्ती असायला हवी. कोणतेही काम सचोटीने करायला शिका. सतत मोठा विचार करा.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. संजय चाकणे म्हणाले की, आजच्या विदयार्थ्यांनी प्रसारमाध्यमांचा चांगला उपयोग करायला हवा. विदयार्थ्यांनी लिहितं व्हावं. त्यातूनच त्यांना सर्जनशील लेखनाची नवी वाट सापडणार आहे. आयुष्य आनंदाने जगायला शिका भरपूर वाचन करा. विविध विषयांचा अभ्यास करा त्यातूनच जगण्याचे विविध मार्ग आपोआप सापडत जातील.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर यांनी केले. यावेळी पारनेर महाविद्यालयातील 157 स्नातकांना, मुलिकादेवी महाविद्यालयातील 45 स्नातकांना, श्री. टाकळी ढोकेश्‍वर महाविदयालय टाकळी ढोकेश्‍वर येथील 63 स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली.
यावेळी डॉ. सदानंद भोसले हिंदी विभागप्रमुख सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, श्री मुलिकादेवी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सहदेव आहेर, परीक्षाधिकारी प्रा. विकास रोकडे, श्री ढोकेश्‍वर मराविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीधर जाधव, परीक्षाधिकारी प्रा. प्रकाश गावित, उपप्राचार्य डॉ. तुकाराम थोपटे, परीक्षाधिकारी डॉ. सुधीर वाघ, प्रा. दत्तात्रय घुंगार्डे, रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. दिलिप ठुबे, विद्यापीठ प्रतिनिधी मयुर ठाणगे, सावकार काकडे, संगीता झावरे, बाळासाहेब सुर्यवंशी आदी उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन प्रा. हरेश शेळके, प्रा. शिवाजी पठारे यांनी तर आभार डॉ. सुधीर वाघ यांनी मानले.