Breaking News

चंदनबाला मंडळाचे वतीने ज्येष्ठ महिलांचा सत्कार

चंदनबाला जैन मंडळाने महिला दिनानिमित्त समाजातील पाच ज्येष्ठ महिलांचा सत्कार आयोजित करत विविध मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले. जैन स्थानक येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमामध्ये जडूबाई छाजेड, विठाबाई बोरा, उज्ज्वला बोथरा, लीलाबाई बोरा, सुरजबाई भंडारी यांचा सत्कार केला. पतीचे निधन झाल्यानंतर या पाचही महिलांनी खचून न जाता अत्यंत धैर्याने जीवन जगताना परिस्थितीवर मात करत आपल्या मुलांना घडविले. गेली अनेक वर्ष त्या परिवाराला मायेने मार्गदर्शन करत असल्याबद्दल त्याच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी अत्यंत भावनिक ठरलेल्या या कार्यक्रमात चंदनबाला जैन मंडळाच्या वतीने या पाचही ज्येष्ठ महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महिलांनी जय महावीर बोरा याने सादर केलेला आईपासून शिक्षणासाठी वा इतर कारणासाठी दूर राहणार्‍या मुलांच्या भावना व्यक्त करणारा डान्स, स्वाती बोरा, वर्षा कोठारी, सुवर्णा बोरा यांनी मैत्री या विषयावर सादर केलेले नाटक, ज्योती बोरा, अनिता खाटेर, लीनता खाटेर, पुष्पा कोठारी, सुरेखा बोरा, जयश्री चंगेडिया, यांनी नवकारमंत्र गीत सादर केले. चंदनबाला बोरा, सविता छाजेड, सुजाता नहार, शीतल बोरा, स्वाती बोरा, वर्षा कोठारी, सुवर्णा बोरा, आरती मेहेर यांनी राजस्थानी पेहरावामध्ये घुमर डान्स केला. या सर्व कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आरती मेहेर यांनी केले. या वेळी शहरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.