Breaking News

भिम आर्मी संघटनाचे तालुकाध्यक्षपदी शरद साळवे


जामखेड / ता. प्रतिनिधी । तालुक्यातील नान्नज येथील शरद साळवे यांची भीम आर्मी भारत एकता मिशन महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या जामखेड तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. त्यांची निवड भीम आर्मीचे पश्‍चिम महाराष्ट्र संघटक उतरेश्‍वर कांबळे यांनी त्यांना नान्नज येथे निवडीचे पत्र देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहे. या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद रावण व राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतनसिंग तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोक कांबळे हे आहे. या वेळी महाराष्ट्र संघटक कांबळे बोलताना म्हणाले की, ही भिम आर्मी संघटना फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराची असून आम्ही प्रमाणिकपणे काम करत आहे, असे म्हणाले. तसेच बोलताना नवनिर्वाचित जामखेड तालुकाध्यक्ष साळवे म्हणाले की, मी सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन काम करणार, ज्या व्यक्तीवर अन्याय अत्याचार झाला, तर त्या अन्यायला वाचा फोडण्याचे काम करणार तसेच गोरगरीब, दीन दलितांसाठी शासनाच्या नवीन योजना असतील तर त्यांच्यापर्यंत पोहच करणार व भिम आर्मी संघटनेच्या जामखेड तालुक्यात प्रत्येक गावी नवीन शाखेचे उद्घाटन करणार असेही ते म्हणाले, यावेळी नान्नज गावचे उपसरपंच तुळशिराम मोहळकर, ग्रा. सदस्य अनिल भोसले यांनी नवनिर्वाचित तालुका प्रमुख शरद साळवे यांचा गावच्या वतीने सत्कार करण्यात आला. साळवे यांच्या निवडीबद्दल नगरसेवक निखिल घायतडक, सागर आहेर, बाबुराव साठे, अविनाश गायकवाड, विजय साठे, नितीन साळवे, दत्ता कांबळे, रमेश भवाळ, रितेश कदम, यांनी अभिनंदन केले.