Breaking News

रूईगव्हाण येथे गुरुवारी बालआनंद मेळावा

कर्जत तालुक्यातील कुळधरण गटातील शाळांचा बालआनंद मेळावा गुरुवारी ( दि. 22 )होत आहे. मेळाव्यातील सहभागासाठी शाळांनी जय्यत तयारी केली आहे. शिक्षण विभागाचे अधिकारी तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.


सकाळी 9 वाजेपासून शाळांतील विद्यार्थी विविध उपक्रम, कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. चिमुकल्या बालकांसाठीचा हा आनंदी उत्सव आहे. यामध्ये विद्यार्थी खरेदी विक्रीचा प्रत्यक्ष अनुभव घेणार आहेत. हजारो विद्यार्थी सहभागी होत असल्याने रूईगव्हाण शाळेत सर्व तयारी करण्यात आली असुन परिसर सुशोभित करण्यात आला आहे. गटातील शाळांनी मेळाव्याला जाण्यासाठीचे नियोजन केले असुन वाहनांची सोय करण्यात आली आहे. आपल्या शाळेची ओळख पटण्यासाठी शाळांनी फलक तयार केले आहेत. बाल आनंद मेळाव्याची तयारी म्हणून कुळधरण येथील चिंचेचे लवन जिल्हा परिषद शाळेत बुधवारी कागदापासुन टोप्या बनविण्याचा उपक्रम राबविण्यात आल्याचे शिक्षक संतोष अनभुले यांनी सांगितले.