दुधोडी येथे धर्मनाथ यात्रोत्सव संपन्न
कर्जत तालुक्यातील दुधोडी येथे नवनाथ पंथातील एक असलेले धर्मनाथ यांचा यात्रोत्सव उत्साहात संपन्न झाला.पाडव्याला सुरू झालेला उत्सव दोन दिवस चालला.नाथ संप्रदायातील धर्मनाथ यांचे दुर्मिळ मंदिर दुधोडी येथे आहे. त्यामुळे या उत्सवाला विशेष महत्व असुन भाविकांची याठिकाणी जनसागर एकत्र येत असतोे. येथील संपूर्ण मंदिर हे हेमाडपंथी पध्दतीचे आहे. मंदिराला आकर्षक असा पायर्यांचा घाट आहे. यात्रेच्या पहिल्या दिवशी पालखीची गावातून वाजतगाजत मिरवणुक काढण्यात आली. पालखी समोर पारंपरिक लेझीम पथकांनी सादरीकरण केले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. संध्याकाळी लोकनाट्य तमाशा मंडळाचा करमणुकीचा कार्यक्रम झाला. दुसर्या दिवशी हजेरीचा कार्यक्रम होवून तिसर्या प्रहरी कुस्त्यांचा जंगी हगामा संपन्न झाला. राज्याच्या विविध भागातील मल्लांनी मैदान गाजविले. कुस्त्यांचा आनंद घेण्यासाठी तालुक्याच्या विविध भागातून लोकांनी गर्दी केली होती. यात्रेत येणार्या भाविकांच्या सोयीसाठी यात्रा कमिटी, ग्रामपंचायत, सेवा सोसायटी व ग्रामस्थांनी चोख व्यवस्था केली.
