Breaking News

सत्कार्यानेच देशाची प्रगती : प्रा. देशमुख

महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी खूप भाग्यवान आहेत. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना जे ज्ञान मिळाले, त्याद्वारे जीवनात त्यांना सत्कार्य करण्याची प्रेरणा मिळाली. यामुळे देशाची प्रगती नक्कीच होते, असे प्रतिपादन प्रा. चंद्रकांत देशमुख यांनी केले. 

येथील श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयात वाङ्ममय मंडळाच्यावतीने आयोजित इंग्रजी शब्दकोश वितरण कार्यक्रमाप्रसंगी केले. यावेळी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा.मेधा शिरोडे, पर्यवेक्षक डॉ.शांताराम रायसिंग, कला शाखेचे समन्वयक प्रा.निमसे व वाङ्मय मंडळाच्या कार्याध्यक्षा प्रा.सुरेखा भवर आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलतान प्रा.देशमुख म्हणाले की, या महाविद्यालयाची गौरवशाली परंपरा टिकून आहे. मला सुध्दा या महाविद्यालयातून नेहमीच स्फर्ती आणि उत्साह मिळतो. डॉ.कावळे सर यांना मी माझे गुरु मानतो. कारण त्यांच्यामुळे मला इंग्रजी साहित्याची गोडी लागली. श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयातील कला शाखेतील विद्यार्थ्यांना शब्दकोश देण्याचा उट्ठेश म्हणजे या विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेची आवड निर्माण व्हावी व त्यांना प्रेरणा मिळावी असे मत त्यांनी व्यक्त केले.

प्रास्ताविक करताना महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा.मेधा शिरोडे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांना इंग्रजी शब्दकोश वाचनातून नकीच प्रेरणा मिळेल .यावेळी पर्यवेक्षक डॉ.शांताराम रायसिंग म्हणाले की, समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो ही भावना मनात ठेवून प्रत्येकाने समाजकार्य करणे गरजेचे आहे. यावेळी एकुण २५ गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना इंग्रजी शब्दकोशाचे वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा.सारिका शिंदे, प्रा.राजश्री पांडुलकर यांनी केले तर आभार प्रा.योगिता पाटील यांनी मांडले. वाङ्मय मंडळाच्या कार्याध्यक्षा प्रा.सुरेखा भवर यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले व यशस्वीपणे कार्यक्रमाचे नियोजन केले.