Breaking News

‘प्रवरा’मध्ये राष्ट्रीय परिषद उत्साहात


प्रवरानगर प्रतिनिधी  - लोणी येथील प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या केमिकल इंजिनिअरिंग विभागातर्फे ‘न्यू फ्रंटियर्स इन केमिकॅल इंजिनीरिंग’ या विषयावर तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या उत्साहात ही राष्ट्रीय परिषद पार पडली, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यशवंत खर्डे यांनी दिली.

या राष्ट्रीय परिषदेचे उदघाट्न अमरावती विद्यापीठाचे माजी विभागप्रमुख डॉ. आर. एस. सपकाळ यांच्या हस्ते झाले. या परीषदेत सन फार्माचे चंद्रमोहन निबे उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना डॉ. सपकाळ यांनी या उपक्रमाचे विशेष कौतूक केले.