Breaking News

रेनवडी यात्रेची सांगता उत्साहात

जिल्ह्यातील अनेक पुरस्कार प्राप्त गाव म्हणून पारनेर तालुक्यातील कुकडी नदी तीरावर असलेले रेनवडी गावची ओळख सरपंच भिवसेन येवले यांनी महाराष्ट्राला रेनवडी गावची ओळख पुरस्काराचे गाव म्हणून केली आहे. येथील ग्रामदैवत श्री मुक्ताई देवीची यात्रा विविध धार्मिक व भक्तीभावाने यात्रेची सांगता मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

यात्रेनिमित्त काठी मिरवणूक, देवीला साडी, चोळी शेरणी प्रसाद, भजन, किर्तन, प्रवचन, काकडा अशा धार्मिक वातावरणात यात्रा संपन्न झाली.यावेळी मनोरंजन कार्यक्रम तसेच जंगी कुस्त्यांचा आखाडा भरवण्यात आला. या आखाड्यात जुन्नर, शिरुर, खेड, आंबेगांव, मंचर, हवेली, पारनेर, श्रीगोंदा, अहमदनगर, पुणे, बीड या भागांतील तसेच परराज्यातील नामवंत मल्ल कुस्तीपटू सहभागी झाले होते. अनेकांनी चितपट कुस्ती करत लाखो रुपयांची बक्षिसे मिळवली.पाबळ येथील राज्यस्तरीय कुस्ती खेळाडू श्री साईनाथ विद्यालयाची विद्यार्थीनी राणी कापसे हिचा रेनवडी ग्रामस्थांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी रेनवडी ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.