Breaking News

दुर्गापुर येथे आजपासून यात्रोत्सव

राहाता तालुक्यातील दुर्गापूरचे ग्रामदैवत श्री आनंद आणि काशीआईचा यात्रा उत्सव आजपासून प्रारंभ होत आहे.
यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. ग्रामदैवत श्री आनंद बाबा नवसाला पावणारे देवस्थान असल्याकारणाने नगर जिल्ह्यासह, राज्यभरातून भाविक या यात्रेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होतात. यात्रेनिमित्त मंदिर परिसरामध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. उद्या मंगळवारी रोजी काठीची मिरवणूक शोभेच्या दारूची आतषबाजी मनोरंजनासाठी तमाशा याचबरोबर बुधवारी कुस्त्यांचा हगामा आदी कार्यक्रम होणार आहे. भाविकांनी या यात्रेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.