Breaking News

पारनेर पब्लिक स्कूलचा अविनाश वाघ प्रज्ञाशोध परीक्षेत चौथा


येथील पारनेर पब्लिक स्कुलचा अविनाश वाघ प्रज्ञाशोध परीक्षेत चौथा क्रमांक मिळविला असुन, आज नगरमध्ये झालेल्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात मुख्यमंत्र्याच्या सल्लागार व भाजपच्या प्रदेश प्रवक्ता श्‍वेता शालिनी यांच्याहस्ते त्यास पारितोषिक देण्यात आले. नगरमधील विद्या प्रतिष्ठान व शिक्षणशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या प्रज्ञाशोध परीक्षेचा पारितोषिक वितरण केडगाव येथील डॉ. हेडगेवार शैक्षणिक संकुलात संपन्न झाला, यावेळी यशवंत पटवर्धन, भाजपाचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, सचिन तांबे , विद्या प्रतिष्ठणचे अध्यक्ष दादासाहेब ढवान, सोमनाथ दिघे, अरुण धर्माधिकारी, सतीश झिकरे, प्राचार्य रवींद्र चोभे आदी मान्यवर उपस्थित होते.अविनाश हा 7 वी मध्ये शिकत असून, त्यास चौथीची स्कॉलरशिप मिळालेली आहे, नवोदय परीक्षेत त्याची निवड हस्ताक्षर, वक्तृत्व, सांस्कृतिक कार्यक्रमात त्यास अनेक बक्षिसे मिळालेली आहेत. त्याचे वडील प्रा. डॉ. सुधीर वाघ हे पारनेर कॉलेजमध्ये परीक्षा अधिकारी असून आई निर्मला या प्राथमिक शिक्षिका आहेत.