फरशी ते भारत कटपीस पर्यंतच्या रस्ता काँक्रिटीकरण कामाला न्यायालयाचे ‘जैसे थे’चे आदेश
खामगाव,(प्रतिनिधी): खामगाव नगर परिषदेतील सत्ताधारी भाजपाने बहुमताच्या जोरावर जनतेच्या पैशाची उधळपटट्ी करुन भ्रष्टाचार करुन मलीदा लाटण्याच्या उदद्ेशाने खामगाव शहरातील भारत कटपीस ते फरशी रस्त्यापर्यंतच्या रस्ता काँक्रींटकरणाचे काम सुरु केले. काँग्रेसजण विकासकामांना विरोध करतात अशी नागरिकांची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न देखील भाजपाच्या वतीने करण्यात आला. या परिसरातील व्यापार्यांना व नागरिकांना न्याय मिळवून देण्यासठी व जनतेच्या पैशाची होणारी उधळपटट्ी थांबविण्यासाठी काँग्रेस गटनेता सौ.अर्चनाताई टाले यांनी या रस्ता कामा बाबत उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर यांच्याकडे याचिका दाखल करुन दाद मागितली. यावर दि.1 मार्च 2018 रोजी मा.न्यायालयाने उक्त याचिकेवर ‘जैसे थे’चे आदेश दिले आहे व संबंधित कंत्राटदारांना देखील पार्टी करुन इतर सर्व प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे निर्देश मा.न्यायालयाने दिले आहे. यावरुन प्रथमदर्शी सत्याचा विजय झाला आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस गटनेता सौ.अर्चनाताई टाले यांनी दिली आहे.