Breaking News

ना.पंकजा मुंडेच्या पीएची टक्केवारी घेतल्याची ऑडीयो क्लिप व्हायरल


बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या पीएची आणि अन्य एका व्यक्तीच्या संभाषणाची ऑडियो क्लिप काल वार्यासारखी व्हायरल झाली आहे. यामध्ये कामाच्या टक्केवारीबाबत पंकजा मुंडेंच्या पीएशी बातचीत केल्याचा दावा केला जातोय. या बातचीतीत ज्या कार्यकर्त्याने पैसे नेले त्याचे नाव आणि त्याच्या गाडीचा नंबर जो सांगितला जातोय तो कार्यकर्ता पंकजा मुंडेंच्या जवळचा आहे. विशेष म्हणजे ही चर्चा फोनवर करायची नसते. प्रत्यक्षात येऊन भेटा. असंही यामध्ये बोललं जात आहे. काल धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर आज ही ऑडियो क्लिप बाहेर आल्याने जिल्ह्यासह राज्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. सभागृहात प्रश्‍न विचारण्यासाठी धनंजय मुंडे पैसा घेतात असा आरोप झाल्याने आज दोन्ही सभागृहात सताधार्यांनी प्रचंड काहूर माजवला आसतानाच आज सकाळपासुन सोशल नेटवर्किंग मीडियावर राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या पीएची एक ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये यवतमाळ स्थित व्यक्ती थेट पंकजा मुंडे यांच्या पीएशी बातचीत करीत आहे. तुम्ही पाठवलेल्या माणसाकडे पैसे पाठवले आहेत ते भेटले का? एवढी टक्केवारी नसते. ताईंना सांगा यासह अन्य बाबी बोलत आहे. यावर ताईंचा पीए या गोष्टी फोनवर बोलायच्या नसतात. प्रत्यक्ष येऊन बोला असं म्हणतात त्याचबरोबर पैसे पोहचल्याची कबुलीही देतात. दुसरीकडे या ऑडियोमध्ये जो व्यक्ती पीएशी बोलत आहे. त्याने ज्या व्यक्त ीकडे पैसे दिलेले आहेत त्या व्यक्तींच सांगितलेलं नाव आणि गाडी नंबर पाहता हा व्यक्ती मुंडेंसह त्यांच्या पीएच्या जवळचा आहे. सदरची व्यक्ती ही टक्केवारीची बोली करताना आ ॅडियो क्लिप वार्यासारखी व्हायरल झाली आहे. यामुळे राज्याभरात प्रचंड खळबळ उडाली आहे.