Breaking News

एटीएम मधून परस्पर पैसे गायब

नाशिक वार्ताहर : येथील बँक ऑफ इंडिया अंबड शाखेतील एका ग्राहकाच्या खात्यातून एटीएमद्वारे परस्पर पैसे काढल्याच्या एस एम एस आल्याने हतबल ग्राहकाने या संदर्भात संबं धित बँक व्यवस्थापन तसेच पोलीस हद्दीतील अंबड पोलीस ठाणे येथे तक्रारी अर्ज देऊनही कोणीही दखल घेतली नाही.
 
दरम्यान चव्हाण कुटुंब प्रमुखाचे पूर्ण पगार गेल्याने उपासमार होत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयात दिली. अशा या फसवणुकीच्या प्रकारामुळे यापुढे आपल्या खात्यात पैसे सुरक्षित रहातीलच काय असा प्रश्‍न सर्वसामान्य चव्हाण कुटुंबाला पडला आहे. 

अक्षय मधुकर चव्हाण रा. सिडको या ग्राहकाचे बँक ऑफ इंडियाच्या अंबड शाखेत सेव्हिंग खाते क्र 082610110010048 या क्रमांकाचे खाते असून दि. 12.नोव्हेंबरला खात्यातून एटीएम द्वारे रात्री 11. 48 ते 50 वाजेपर्यंत अनुक्रमे 10 हजार, 10 हजार व शेवटी पाच हजार रुपये असे सुमारे पंचवीस हजार रुपये दिल्ली येथील एटीएम मधून परस्पर पैसे काढून फसवणूक झाली. त्यांना पैसे काढल्याचा मेसेज बँकेत रजिस्टर असलेल्या भ्रमणध्वनी क्र 8108908059 यावर आल्याने पैसे काढल्याची बाब उघडकीस आली. 

या संदर्भात अंबड पोलीस ठाण्यात दि. 13 नोव्हेंबरला तक्रार अर्ज देखील देण्यात आला आहे. पण अंबड पोलिसांनी कोणत्याही प्रकारचा तपास न करता काहीच दखल घेतली गेली नसल्याने मग न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्‍न त्यांना पडला आहे.