अण्णांच्या आंदोलनासाठी पाथर्डी येथुन पाठिंबा
अण्णा हजारे यांनी दिल्ली येथे 23 मार्च रोजी सुरू झालेल्या आंदोलनालाला पाथर्डी येथून सामाजिक कार्यकर्त्यांच्या व तालुका समिती तर्फे तहसीलदार नामदेव पाटील यांना अण्णा हजारे याच्या आंदोलनासाठी पाठींब्याचे पत्र देण्यात आले. तहसीलदार नामदेव पाटील यांनी सुट्टीचा दिवस असताना ही निवेदन देणार्या सामाजिक कार्यकर्त्याच्या भावना समजून घेत निवेदन स्वीकारले .
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सर्व राज्यात लोक आयुक्त व केंद्रामध्ये सक्षम लोकपालची तात्काळ नियुक्ती करावी,शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित दिडपट हमीभाव मिळावा व इतर महत्वाच्या आठ मागण्यांसाठी जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे हे दिनांक 23 मार्च पासून दिल्ली येथे रामलीला मैदानावर आंदोलन करीत आहेत.आंदोलनापूर्वी या मागण्यासाठी अण्णांनी केंद्रसरकार व पी. एम. ओ. कार्यालयाशी अनेकवेळा पत्रव्यवहार करून विनंती केली आहे. परंतु एकाही पत्राचे उत्तर पी.एम.ओ.कार्यालयाने दिला नाही याचा खेद वाटतो. सन 2014 च्या निवडणूक प्रचारादरम्यान मोदी सरकारने सक्षम लोकपाल नियुक्ती केला जाईल असे जनतेला सांगितले केले.परंतु चार वर्षे उलटूनही अद्याप लोकपाल नियुक्त केला नाही. उलट लोकपाल बिलामध्ये कलम 63 व 44 मध्ये सुधारणा करून भ्रष्ट्राचाराना अभय देण्याचा व पाठीशी घालण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. हा लोकशाहीला मोठा धोका आहे.
तरी वरील सर्व मागण्या अहिंसेच्या मार्गाने अण्णा हजारे रामलीला मैदानावर दिल्ली येथे आंदोलन करीत आहेत. त्यामुळे अण्णांच्या आंदोलनाला पाथर्डी तालुका समितीचा व जनतेचा संपूर्ण पाठींबा आहे अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.यावेळी किसन आव्हाड, सोमनाथ बोरुडे, पत्रकार हरिहर गर्जे, भागवत नरोटे, अरविंद सोनटक्के, भास्कर दराडे, डॉ योगीराज देशमुख, सुरेश आव्हड, सोमनाथ बोरुडे, कल्याण शेळके, प्रदीप नरोटे,जालिंदर सांगळे,पत्रकार सचिन दिनकर आदी उपस्थित होते