Breaking News

बालआनंद मेळाव्यात नांदुरशिकारी शाळेचे सुयश


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गट अंतर्गत राबविण्यात आलेल्या कुकाणा गटाचा बालआनंद मेळावा गणातील गेवराई जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उत्साहात पार पडला. गटातील विविध शाळेतील विद्यार्थीनी सहभाग घेत आपल्या बाललीलांनी उपस्थित मान्यवर पाहुण्यांना मोहीत केले. 

या कार्यक्रमामध्ये नांदूर शिकारी शाळेने विविध प्रकारच्या नाटीका, रांगोळी, समूहगीत, खाद्य दालन,व संगितमय सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेऊन लक्षवेधक यश मिळवले . रांगोळी स्पर्धेत प्रणिता लिपने हिने लहान गटात प्रथम , चित्रप्रदर्शन लहान गटात प्रतिक्षा लिपने हिने प्रथम क्रमांक पटकाविला तर सांस्कृतिक कार्यक्रम मोठया गटात शाळेच्या ’जय हो ’ या समूहगीत नृत्याने उपस्थितांना तालबद्ध ठेका धरायला लावला .तर खाद्य दालनामध्ये नांदूरशिकारी शाळेच्या प्रशांत लिपने व हनुमान बेडके यांच्या ’पाणी पुरी’ स्टॉलने धमाल केली .तर खवैयेगिरीत सर्वात जास्त पसंतीस उतरला तो योगिता शिरसाठ , निकिता लिपने , सीमा खलाटे , अर्चना पवार , सोनाली पवार ,मयूरी तरटे, ऋतूजा गवारे , आश्‍विनी गायकवाड , निकिता खलाटे, ज्ञानेश्‍वरी गुंड, उर्मिला धुमाळ यांच्या चटकदार भेळ या स्टॉलने सर्व पाहुण्यांना मोहिनी घातली .जि.प. चे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे , .प.स. सदस्या डॉ . तेजश्रीताई लंघे , पं .स. उपसभापती राजनंदिनी मंडलीक , पं .स. सदस्या सुषमा खरे , गट शिक्षणाधिकारी विलास साठे या सर्वांनी या भेळीचा आस्वाद घेऊन मुलींचे विषेश कौतुक केले .

बालआनंद मेळाव्यात नांदुरशिकारी शाळेचे विद्यार्थीनी मिळवलेल्या यशाबद्दल सरपंच शशिकला राजमाने , उपसरपंच गोरक्षनाथ लिपने , सेवा सोसायटी अध्यक्ष ज्ञानदेव मुरकुटे , उपाध्यक्ष आसाराम लिपने , माजी सरपंच सतीश कर्डिले , तंटामुक्ती अध्यक्ष रखमाजी लिपने ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विश्‍वनाथ लिपने यांनी अभिनंदन केले .सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय घुले , सुनिता पाचेगावकर, पंढरीनाथ काशिद , लक्ष्मण गायकवाड , नामदेव धायतडक , अंबादास बोरुडे , आशा माने , गोपाळ राऊत , क्रिडा शिक्षक अंकुश नवले , कलाशिक्षक रविंद पवार , कार्यानुभव शिक्षक सचिन लिपने यांचे मार्गदर्शन लाभले.