Breaking News

ध्यान-ज्ञान मंदिराबरोबरच जलमंदिराची गरज--सुनीलगिरी


ध्यान आणि ज्ञान मंदिरा बरोबरच आज जल मंदिरांची गरज असल्याचे प्रतिपादन श्रीक्षेत्र त्रिवेणीश्‍वरचे महंत सुनीलगिरीची महाराज यांनी महाराज केले.भेंडा येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात आयोजित हनुमान जयंती व श्रीराम कथा सोहळ्याच्या धर्मध्वजारोहण महंत सुनीलगीरी महाराज यांचे हस्ते झाले त्याप्रसंगी ते बोलत होते. श्रीराम कथा प्रवक्ते शंकरस्वामीची महाराज, गोपालगिरी महाराज, अंकुश महाराज कादे, ज्ञानेश्‍वर कारखान्याचे संचालक काशिनाथ नवले, अशोकराव मिसाळ, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे ,गणेश गव्हाणे उपस्थित होते.

महंत सुनीलगिरी पुढे म्हणाले की भास्करगिरीजी महाराज हीच सर्वांची ऊर्जा आहे. त्यांचे मार्गदर्शन व आशीर्वादाने सर्व आध्यात्मिक कार्य पार पाडतात. नीती आणि अनीतीच्या युद्धात नितीचाच सदैव विजय होत असतो हेच रामायण व महाभारतामधून सिद्ध होते. शक्ती,भक्ती आणि युक्ती एकत्र आल्यास कोणतेही कार्य पूर्णत्वास जाते.दक्षिणमुखी हनुमान हे विजयाचे प्रतीक आहे.निष्ठेने भक्ती उपासना केल्यास कार्य सिद्धी होते.
यावेळी शंकरजी स्वामी महाराज, काशिनाथ नवले ,गणेश कुलकर्णी यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी जलमित्र सुखदेव फुलारी, गोरक्षनाथ कापसे, भिवाजी आघाव, डॉ. सुभाष भागवत,डॉ. लहानु मिसाळ, बापूसाहेब नजन, शिवाजी फुलारी, भाऊसाहेब गायकवाड, प्रमोद गोडसे,चांगदेव जगताप,अर्जुन शिंदे,कल्याण मडके,समाधान शेलार,अण्णासाहेब पिंपळे,.लताताई मिसाळ, .सुरेखा मंडलिक आदी उपस्थित होते.अशोक पंडित यांनी सूत्रसंचालन केले. वाल्मिकी लिंगायत यांनी आभार मानले.