Breaking News

मोतीबिंदू हटाव तिसरे शिबीर संपन्न

अळकुटी /प्रतिनिधी /- साखला परिवार यांच्या माध्यमातून व अहमदनगर येथील जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषी नेत्रालय ,कुंदनकाका साखला मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदू निदान व शस्त्रक्रिया तिसरे शिबीर नुकतेच संपन्न झाले. यामध्ये ५५ व्यक्तीना नवीन दृष्टी मिळाली. प्रत्येक महिण्याच्या ६ तारखेला या शिबिराचे आयोजन केल्या जाते. शिबिराचे उदघाटन हभप हनुमंत महाराज झिंजाड यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी अळकुटी सरपंच बाबाजी भंडारी ,उपसरपंच मधुकर जाधव ,कुंदनकाका साखला,महेश शिरोळे, माजी सरपंच सखाराम उजघरे ,डॉ. उत्तम थोरात,सामाजिक कार्यकर्ते संजय मते, माजी सरपंच बाळकृष्ण परंडवाल ,माजी चेअरमन बाळासाहेब चौधरी ,रुपेश परंडवाल ,विठ्ठल भंडारी,राजू दाते,सहादू भंडारी,हनुमंत चौधरी, रवींद्र गोरडे, मुन्ना पगारिया अतुल साखला,भाजप तालुका उपाध्यक्ष रामदास नरड, पांडुरंग कवडे ,जावेद कुरेशी ,दत्ता रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते.