Breaking News

पारनेरमध्ये निलेश लंके यांच्या वाढदिवसाचा फलक फाडला

पारनेर/प्रतिनिधी / - शहरात शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेला फलक अज्ञात इसमांनी शुक्रवार,९ मार्चच्या रात्री फाडला.त्यामुळे समर्थकांनी पारनेरमध्ये लावलेला फलक फाडल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र काही वेळाने या प्रकरणावर पडदा पडला. हा फलक शहरातील लंके समर्थक विजय औटी यांनी लावला होता. फलक फाडणाऱ्या अशा प्रवृत्तींचा निषेध लंके समर्थक औटी यांनी केला. आमदार पुत्र अनिकेत औटी व निलेश लंके यांच्यात काही दिवसांपासुन संघर्ष सुरू आहे. यातुनच हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. पारनेरमध्ये पुन्हा आ. औटी घराण्याची दहशत निर्माण झाल्याने लंके समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.