Breaking News

चोंभूत गावाने अप्रतिम मंदिर उभारले : शिंदे


अळकुटी /प्रतिनिधी /- चोंभूत गावाने एकोप्याच्या साह्याने गावांमध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामनिधी,वैयक्तिक निधी,ग्रामस्थांच्या सहकार्यातून मोठ्या प्रमाणात विकास केला आहे . चोंभूत येथील कानिफनाथ मंदिरांची अप्रतिम उभारणी केली. असे वक्तव्य अण्णा हजारे युवा मंचचे अध्यक्ष राहुल शिंदे यांनी व्यक्त केले. 

यावेळी कोहकडी गावचे सरपंच डॉ. साहेबराव पानगे, सामाजिक कार्यकर्ते प्रतापभैय्या शिंदे, बबलू थोरात,किरण रासकर,अंकुश वडणे ,रवी वाव्हळ ,स्वामी समर्थ बँकेचे मॅनेजर शिंदे आदी मान्यवरांचा सत्कार चेअरमन बबनराव शेळके यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रा. टी. एन. घोलप,प्रा. डॉ. शरद पारखे, ग्राम पंचायत सदस्य रावसाहेब माळी ,गणेश माळी, मच्छिन्द्र माळी, पोपट माळी ,श्रीकांत माळी आदी मान्यवर उपस्थित होते