भिडेंना आठ दिवसात अटक करा अॅड. प्रकाश आंबेडकर यांचा सरकारला अल्टिमेट
मुंबई : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात मनोहर भिडे हे एक नंबरचे आरोपी असून, त्यांना आठ दिवसांत अटक करा, असा अल्टिमेट भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला. तसेच अटक झाली नाहीतर कुणाची प्रकरणे बाहेर काढायची हे आम्हाला चांगलं माहिती आहे असा इशाराही आंबेडकर यांनी यावेळी दिला. कोरेगाव भीमा प्रकरणी हिंसाचाराचा आरोप असलेल्या मिलिंद एकबोटे याला अटक झाली. मात्र, संभाजी भिडे यांना अद्यापही अटक झालेली नाही, त्यामुळे भिडे याला अटक करण्याच्या प्रमुख मागणीसह सोमवारी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत एल्गार मोर्चा काढण्यात आला होता.
भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी मिलिंद एकबोटेंना अटक करण्यात आली. मात्र, मनोहर भिडेंना अद्यापही अटक करण्यात आली नाही. भिडेंना अटक करण्यात यावी या मागणीसाठी मुंबईत आझाद मैदानावर भारिप बहुजन महासंघाच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला होता. आझाद मैदानावर रणरण्यात उन्हात भिमसैनिकांनी तुफान गर्दी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकाश आंबडेकर यांना चर्चेसाठी निमंत्रण धाडले. प्रकाश आंबेडकर यांच्या शिष्टमंडळाने विधिमंडळात जाऊन मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली आणि आपल्या वेगवेगळ्या मागण्या मांडल्या. जर आठ दिवसांत भिडेंना अटक झाली नाही तर आम्हालाही माहिती आहे, कोणाच्या शेपटीवर कधी पाय द्यायचा कोणती प्रकरणे क धी बाहेर काढायची. मग सरकारने बोलू नये तुम्ही व्यक्तिगत भांडण करताय असा इशारा आंबेडकर यांनी दिला.
तसेच संभाजी भिडे यांना अटक करायची असेल तर रावसाहेब पाटील यांची पोस्ट होती. त्यावर मुख्यमंत्र्यांना मारून टाका अस लिहीले होते. त्यावर मनोहर भिडेंचा फोटो होता. रावसाहेब पाटील यांना अटक करा त्यांच्यापासून भिडेंपर्यत पोहचता येईल असेही आंबेडकर म्हणाले. आता मनोहर भिडेंना मोदींची फूस आहे की, भिडे मोदींना फूस लावतायेत हे बघावे लागेल अशी टीकाही प्रकाश आंबेडकर यांनी केली. या एल्गार मोर्चात सीएसटीला भारिप बहुजन महासंघासह संभाजी बिग्रेड, मराठा महासंघ, धनगर टायगर फोर्स, ओबीसी, माळी आणि लिंगायत संघटनांनी सहभाग घेतला आहे. यामुळे मोठ्या संख्येने लोक रस्तावर उतरतील, अशी शक्यता आहे.