अविश्वास ठरवावरुन विधानसभेत गोंधळ
मुंबई : विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या विरुद्ध विरोधकांनी आणलेल्या अविश्वास ठरवावरुन झालेल्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकुब करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी अध्यक्षांच्या बाजूने विश्वास दर्शक ठराव मांडला. मात्र हा ठराव नियमाला धरून नाही.तसेच नियमानुसार काम होत नसल्यामुळे आमचा अविश्वास ठराव कायम आहे. अध्यक्षांनी आमच्या ठरावाला विचारात घ्यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, दिलीप वळसे पाटील आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सभागृहात केली. यावेळी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांमध्ये गोंधळ पाहायला मिळाला. म्हणून सभागृहाचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकुब करण्यात आले.