Breaking News

संभाजी भिडे आणि संबंधितांवर मुख्यमंत्र्यांचे कारवाईचे आश्‍वासन

कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी संभाजी भिडे आणि संबंधितांवर 8 दिवसांमध्ये कारवाई करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना दिले.पंतप्रधान नरेंद्र मोदी मनोहर भिडे यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला आहे. भिडे यांना अटक करा. ही अटक झाली नाही, तर कुठल्या शेपटीवर कधी पाय द्यायचा हे आम्हाला माहित असल्याचेही आंबेडकर म्हणाले. कोरेगाव भीमा प्रकरण हे माझ्या 3 वर्षाच्या कारकिर्दीतील काळा डाग असल्याची खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.