Breaking News

आखतवाडे येथे कालभैरवनाथांचा यात्रोत्सव


शेवगाव तालुक्यातील आखतवाडे येथील श्री कालभैरवनाथांचा यात्रोत्सव सालाबादप्रमाणे याही वर्षी संपन्न होत आहे. शुक्रवार दि. 30 व शनिवार दि 31 मार्च रोजी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे . 

शुक्रवार दि 30 रोजी पहाटे 5 वा. श्रीभैरवनाथांचा अभिषेक व आरती , सकाळी 9 वा पैठण वरुन कावडीने आणलेल्या गंगाजलाची मिरवणूक व जलाभिषेक, ज्वारीच्या पिठाची आंबील, गुल चपातीचा मलिदा,नैवेद्य, द.ु3 वा. गुळाची शेरणीचा प्रसाद, रात्री 9वा. दीपमाळेला दीप प्रज्वलित करून छबिना मिरवणूक व फटाके आतिषबाजी, दु. 4 वा. महाराष्ट्रातील नामांकित पहिलवानांचा जंगी कुस्तीचा हंगामा व रात्री 9 वा. श्रीभैरवनाथांची आरती व चांदीच्या मुखवट्याची मुख्य मंदिरा पासून शेजघर मंदिरापर्यंत मिरवणूक, रात्री 12 वा. शेजघर मंदिरात श्री भैरवनाथ स्थापना व आरती , यात्रेची सांगता होईल . यात्रेसाठी संपूर्ण गावातील व गावामध्ये येणार्‍या सर्व रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली आहे. तसेच रस्तावरती एल ई डी लाईट बसविण्यात आले आहे, त्याचप्रमाणे येणार्‍या भाविकांच्या वाहनांची पार्किंग ची व्यवस्था करण्यात आली आहे .पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे तरी यात्रेसाठी आखतवाडे आणि तालुक्यातील सर्व हलवाई, खेळणी ,स्टेशनरी, रहाटपाळणे व आदि विक्रेत्यांनी उपस्थित राहून यात्रेची शोभा वाढवावी असे आवाहन श्री भैरवनाथ यात्रा उत्सव कमिटीने केले आहे.