Breaking News

वरखेड येथील महालक्ष्मी देवीच्या यात्रा महोत्सवाची नियोजन बैठक


नेवासा तालुक्यातील वरखेड (देवी) येथे 5 एप्रिल पासून सुरू होत असलेल्या महालक्ष्मी देवीच्या यात्रा महोत्सवाची नियोजन बैठक नुकतीच पार पडली. वरखेड देवस्थान हे पूर्ण राज्यात व राज्याबाहेरही प्रसिध्द आहे. देवीच्या दर्शनासाठी येथे भक्तांची लाखोच्या संख्येने उपस्थिती असते. यावर्षी ही यात्रा दि .5 एप्रिल 2018 रोजी असून, तीन दिवस यात्रेमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम असल्यामुळे येथील नियोजन महत्वाचे असल्याने नुकतीच नियोजन बैठक घेण्यात आली.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे होते. तर आमदार बाळासाहेब मुरकुटे, पोलिस निरीक्षक प्रविण लोखंडे, पंचायत समिती सदस्या सुषमा खरे, सरपंच जयश्री गोरे, आशोक हारदे, पुरूषोत्तम सर्जे, श्रीरंग हारदे, आण्णासाहेब गोरे आदीच्या प्रमुख उपस्थिती बैठक संपन्न झाली.यावेळी ग्रामस्थांनी यात्रा काळामध्ये निर्माण होणार्‍या समस्यांवर चर्चा करण्यात आली . यात्रा काळात चोवीस तास वीज उपलब्ध करून द्यावी, पाण्यासाठी पुरेसे टँकर द्यावे, वाहतुकीचा प्रश्‍न निर्माण होतो याचे पोलिस प्रशासनांनी योग्य नियोजन करावे, यात्रा काळात अवैध धंदे तेजीस येतात याचाबंदोबस्त करावा, शिरसगाव ते वरखेड रस्ता, रामडोह ते वरखेड पालखी मार्ग, आरोग्याच्या सोयी, बस ची व्यवस्था अशा विविध समस्या देवस्थान यात्रा कमिटी व ग्रामस्थांनी मांडल्या.यावेळी तालुक्याचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी आपल्या भाषणातून यात्रा नियोजनासाठी प्रशासनाकडून योग्य ती मदत करण्याची सुचना केल्या. यावेळी बोलताना मुरकुटे म्हणाले, पोलिस प्रशासनांनी यात्रा सुरू होण्यापुर्वी अवैध धंद्यांना आळा घालावा यामुळे यात्रेस अडथळा निर्माण होणार नाही, वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी पोलिसांना मदत म्हणून पोलिस मित्र, ग्रामस्थ, यात्रा कमिटी, युवकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले, महामंडळा विषयी सुचना दिल्या व जास्त जास्त बस उपलब्ध करून देण्यास सांगितले, यात्रा काळात पाणी महत्वाचे असल्याने ऐन वेळी पाणी समस्या निर्माण होऊ नये म्हणून आठ दिवसात पाट पाणी तळ्यात सोडण्या सुचना दिल्या.

आरोग्याबाबत रुग्णवाहिका व औषधाचा पुरवठा करण्यास संबंधित विभागास सांगितले. यात्रा महोत्सव यशस्वी होण्यासाठी वीज महत्वाची असते, मात्र वीज वितरण चे अधिकारी बैठकीस वेळेत उपस्थित न राहिल्यांनी आमदार मुरकुटे यांनी उशीरा आलेल्या अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले होते . प्रामुख्याने ग्रामस्थांच्या वीज वितरण बाबत जास्त तक्रारी असल्याने आमदाराऩी यात्रा काळात तीन दिवस चोवीस तास लाईट सोडण्याचे आदेश दिले.यावेळी देवस्थानचे अध्यक्ष एकनाथ क्षीरसाठ, उपाध्यक्ष लक्षाधीश दाणे,सचिव कडुबाळ गोरे, वरखेड चे पोलिस पाटील संतोष घुंगासे , ज्ञानेश्‍वर उंदरे, भास्कर खरे, वीज वितरण चे वाघ, आरोग्य अधिकारी डाँ.पवार, नेवासा बस आगाराचे सोनवणे, पाटबंधारे विभागाचे देशमुख, आबासाहेब ताकटे, सुनिल कुंढारे,राजाबापू गोरे,रविद्र कुलकर्णी, बंडू हारदे, नवनाथ वाघ, रंगनाथ पवार, आशोक कुंढारे, निलेश कुंढारे, सुनिल गरगडे, आदी सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संजय खरे यांनी आभार मानले.