गाव शंभर टक्के हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प ‘रासेयो’चे शिबीर उत्साहात
प्रवरानगर प्रतिनिधी - येथील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्यावतीने पिंपरी लौकि येथे सात दिवशीय राष्टीय सेवा योजनेच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय एकात्मतेचे सशक्त साधन मानल्या गेलेल्या या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून शंभर टक्के हागणदारी मुक्त गाव करण्याचा संकल्प करण्यात आला.
यावेळी राष्ट्रीय एकात्मता म्हणजे विविध सामाजिक गटांना एका राष्ट्रीय घटकात आणि प्रवाहात सामील करून घेण्याची प्रक्रिया होय, असे प्रतिपादन प्रा. औताडे यांनी केले. तसेच डॉ. सचिन गोंदकर यांनी कृषी क्षेत्रात व्यापार कसा करावा, कृषी व्यवसायातील संधी आणि आव्हाने याबद्द्ल माहिती दिली. अध्यक्षस्थानी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. बी. खंडागळे, होते. प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी लौकी गावचे सरपंच अलका गीते आणि कृषी महाविद्यालयाचे उपप्राचार्य. प्रा. निलेश दळे उपस्थित होते.
या सात दिवसांच्या काळात विद्यार्थ्यांनी गावातील वृक्षारोपण, गावाची स्वच्छता, गावामधील ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन सर्व बागायती, जिरायती क्षेत्रांची माहिती घेतली. प्रास्ताविक प्रतीक्षा अभंग, ज्योती गायकवाड यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वय प्रा.राहुल विखे, प्रा. संतोष वर्पे, प्रा.संदीप पठारे आणि प्रा.प्रवीण गायकर व सर्वे स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले होते. शुभम राख या स्वयंसेवकाने आभार मानले.