पेट्रोलियम पाईप लाईन प्रकल्पाला विरोध होण्याची शक्यता
राहुरी ता. प्रतिनिधी - केंद्र सरकारच्या पेट्रोलियम पाईप लाईन प्रकल्पासाठी शेतकर्यांच्या जमिनींचा ताबा घेतला जाणार आहे. या संदर्भात राहुरी तालुक्यातील काही भागातील शेतकर्यांना जमिनी संपादीत करण्याविषयीच्या नोटीसा आल्याने बागाईत पट्ट्यातील शेतकर्यांमध्ये खळबळ उडाली आहे. अनेक शेतकरी या कामास विरोध करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
केंद्र सरकार सार्वजनिक हितासाठी कोयली-अहमदनगर-सोलापूर पेट्रोलियम पाईप लाईन हा प्रकल्प राबवित आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनद्वारा पेट्रोलियम पदार्थांची वाहतूक जमिनीखालून पाईप लाईन टाकून केली जाणार आहे. ही पाईप लाईन इतर जिल्ह्यासह राहुरी तालुक्यातील टाकळीमियाँ, वाघाचा आखाडा, राहुरी, तांदुळवाडी, देसवंडी आदी भागातून केली जाणार आहे. तसा सर्व्हेदेखील झालेला आहे. त्यामुळे या भागातील अनेक शेतकर्यांना जमिनी संपादीत करण्याच्या नोटीसा इंडियन ऑईल आपल्या बागायत जमिनी पीक पाण्यासह शासन संपादीत करणार असल्याने शेतकर्यांमध्ये खळबळ उडाली आहे. संपादीत केलेल्या जमिनीच्या खाली पाईप लाईन टाकली जाईल व त्याबाबत नियमानुसार वाजवी मोबदला शेतकर्यांना देण्यात येणार आहे. संपादित केलेल्या जमिनीच्या भागामध्ये कोणत्याही प्रकारचे घर, बांधकाम, चर खादणे, तलाव, खोदकाम, झाडे लावणे इत्यादी कामे करता येणार नाहीत. असे शेतकर्यांना दिलेल्या नोटीसीत नमुद करण्यात आलेले आहे.
सदर नोटीस मिळाल्यापासून २१ दिवसांत म्हणणे सादर करण्याचे आवाहनही करण्यात आलेले आहे. या नोटीसीमुळे कमी क्षेत्र व बागायत जमीन मालकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. काही शेतकरी तीव्र विरोध करण्याच्या मनस्थितीत आहेत. नेमके किती क्षेत्र जाणार, कसे जाणार? किती मोबादला मिळणार, या प्रश्नांची उकल शेतकरी करीत आहेत. राहुरी तालुका वगळता इतरही जिल्हा व तालुक्यातील शेतकर्यांच्या जमिनी संपादीत केल्या जाणार असल्याने कोठे काय भूमिका घेतली जाते, याकडे शेतकर्यांचे लक्ष लागले आहे.