Breaking News

श्री जगदंबा विद्यालयात मराठी दिन साजरा

कर्जत तालुक्यातील राशिनच्या श्री जगदंबा विद्यालयात मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला.कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रम सुरु झाला. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य दिलीप खंडागळे होते. साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांची जयंती मराठी राजभाषा दिन म्हणून साजरी केली जाते. यावेळी विद्यालयातील विद्यार्थी यश ओहरा, अनिकेत मोढळे, ओंकार दंड, निखिल खोसे यांची भाषणे झाली. ज्येष्ठ शिक्षिका सुनंदा विसापुरे, मंगल त्रिंबके यांनी मराठी भाषेतील विविध टप्पे उलगडून दाखविले.
प्राचार्य दिलीप खंडागळे यांनी पुराणकाळापासून ते आधुनिक कालखंडापर्यंत मराठी भाषेच्या वाटचालीबाबत माहिती दिली. अनेक भाषा शिका मात्र मराठीला विसरू नका असा मोलाचा संदेश त्यांनी आपल्या भाषणातुन दिला. सूत्रसंचालन सचिन डमरे यांनी केले. उपमुख्याध्यापिका ज्योत्स्ना जोगदंड, पर्यवेक्षक राजकुमार चौरे, हनुमंत लोंढे, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांची उपस्थिती होती.