Breaking News

माकडांच्या हातात कोलीतःसामान्य शिवसैनिकांच्या भावना

नाशिक/ प्रतिनिधी - माकडाच्या हातात कोलीत दिल्यानंतर वणव्यात सारे ऐश्‍वर्य भस्मसात होते.शिवसेनेची आजची अवस्था यापेक्षा वेगळी नाही,अशा शब्दात सामान्य शिवसैनिक आपल्या भावना व्यक्त करून बाळासाहेबांची शिवसेना बडव्यांच्या षडयंञांतून सोडवा असा टाहो फोडत आहेत.तथापी बडव्यांच्या ढोल आवाजाने बहिरे झालेल्या नेतृत्वापर्यंत हा आवाज पोहचत नसल्याने एक दिवस मुडद्यांवर राज्य करावे लागेल हा कधी काळी नाना पाटेकर यांनी शिवसेना नेतृत्वाला दिलेला इशारा नजिकच्या भविष्यात खरा ठरण्याची भिती निष्ठावंतांकडून व्यक्त केली जात आहे.दरम्यान नाशिक जिल्ह्यात शिवसेनेत उभी फुट पडण्यास कारणीभूत ठरलेल्या विधानपरिषदेच्या निवडणूकीत हकालपट्टी झालेले अड.शिवाजी सहाणे यांनी समाज माध्यमांवर सहानुभूती मिळवून घेतलेली आघाडी शिवसेनेच्या गोतास काळ ठरण्याचे संकेत मानले जात आहेत.श्रशरव
विधानपरिषद निवडणूकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झाला नसला तरी राजकीय वातावरण तापू लागल्याने घोषणापुर्व प्रचाराचे वारे वाहू लागले आहेत,विशेषतः अन्य राजकीय पक्षांच्या तुलनेत शिवसेना प्रचारात आघाडीवर असून ही आघाडी शिवसेनेत अंतर्गत धुसफुशीला बळ देत आहे.
सन 2012 च्या विधानपरिषद निवडणूकीत शिवसेनेचे संख्याबळ अवघे सत्तर असतांना शिवसेना प्रमुखांच्या इच्छापुर्तीसाठी अड,शिवाजी सहाणे यांनी बाहुबली प्रतिस्पर्धी उमेदवारांमोर आव्हान उभे करून 225 मतांची शिदोरी शिवसेनेच्या पारड्यात खेचून आणली होती.तांञिक दोषामुळे शिवाजी सहाणे यांना पराभव पत्करावा लागला असला तरी शिवसेनेच्या दरबारात,विधीमंडळाच्या साईटवर शिवाजी सहाणे यांचा आमदार म्हणूनच उल्लेख आहे.या पार्श्‍वभुमी मे 2018 च्या विधानपरिषद निवडणूकीत नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात शिवसेनेच्या उमेदवारीसाठी शिवाजी सहाणे यांचा प्राधान्याने विचार होईल अशी स्वतः सहाणे यांच्यासह सामान्य शिवसैनिकांची धारणा होती,त्या धारणेतून सहा महिन्यांपासून प्रचार यंञणा कार्यरत झाली होती.तथापी फेब्रूवारी महिन्यापासून अचानक उमेदवारीच्या शर्यतीतून शिवाजी सहाणे यांचे नाव मागे पडून नरेंद्र दराडे यांच्या नावाची चर्चा मुख्य प्रवाही माध्यम आणि समाज माध्यमांमधून होऊ लागली.मातोश्रीला घेरलेल्या बडव्यांच्या सांपर्कात राहून दराडे यांनी आपली उमेदवारी सामान्य शिवसैनिकांवर लादल्याचा संदेश त्यातून बाहेर आला.
दरम्यानच्या काळात मराठा क्रांती मोर्चा,बहुजन क्रांती मोर्चा,शिवजन्मोत्सव,मुका मोर्चा हे व्यंग आणि छञपतींच्या घराण्याची रोखठोक बदनामी अशा काही मुद्यांमुळे शिवसेनेची मुळ ताकद असलेला मराठा बहुजन समाज आधीच दुखावलेला असतांना समाजकारणात अग्रभागी राहून वेगळी प्ररतिमा निर्माण केलेले शिवाजी सहाणे यांच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याला बडव्यांकडून नाकारण्याची कृती सामान्य शिवसैनिकाला पचविता आली नाही.गेले वर्षभर सर्वपातळीवर अवमान पचवलेला सामान्य बहूजन शिवसैनिक सहाणेंवर झालेल्या अन्यायाच्या निमित्ताने व्यक्त होऊ लागला.
ज्यांनी सहा वर्षापुर्वी शिवसेनेच्या विरोधात राहून बाहुबली उमेदवाराला साथ दिली,त्या व्यक्तीला उमेदवारी देऊन निष्ठावंत कार्यकर्त्यांचा बळी घेणार्या बडवेगीरी विरूध्द सामान्य शिवासैनिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होऊ लागला आहे.हा सामान्य शिवसैनिक ज्या घटकाचे प्रतिनिधीत्व करतो तो बहुजन समाज शिवासेनेची मुळ ताकद आहे.या ताकदीवर शिवसेनेने आजवरच्या प्रत्येक संघर्षात निर्णायक बाजी मारली आहे.शिवसेनेने राजकीय सौदेबाजी या ताकदीवरच यशस्वी केली आहे.स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत म्हणूनचा या मुळ शक्तीला सन्मानाने वागविले जात होते.त्यांच्या पश्‍चात माञ शिवसेनेच्या नेतृत्वाला बडव्यांनी घेरले,मुळ ताकद असलेला सामान्य बहुजन शिवसैनिक अडगळीत फेकला गेला.दिल्लीत बसून विरोधकांशी राजकीय सौदेबाजी करीत शिवसेनेला कुरतडण्याचा धंदा बडव्यांनी सुरू केला.त्याच बडव्या प्रवृत्तींनी विधानपरिषदेच्या निमित्ताने शिवाजी सहाणे यांच्या उमेदवारीचा बळी देण्यासाठी कुभांडी हकालपट्टी करून नेतृत्वाची दिशाभूल केली आहे.मराठा क्रांती मोर्चा,बहुजन क्रांती मोर्चा,शिवजन्मोत्सव सोहळा अशा सामाजिक व्यासपीठावरून दाखवलेली आक्रमकता,मुका मोर्चा या व्यंगाविरूध्द सर्व प्रथम केलेले बंड आणि काही अंशी प्रतिस्पर्ध्याने केलेली सौदेबाजी या गोष्टी शिवाजी सहाणे यांच्या हकालपट्टीला कारणीभूत ठरल्याची चर्चा व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेत असूनही बहुजन बाणा जगणार्या सामान्य शिवसैनिकांचा अनावर झालेला संताप समाज माध्यम्यांच्या व्यासपीठावरून ओसंडत आहे.गेले वर्षभर शिवसेनेच्या बहुजन द्वेषी भुमिकेविरूध्द धुमसत असलेला बहुजनी अंगार या निमित्ताने फुलत असताना बडव्यां माकड्यांच्या हातात कोलीत आल्याने वणवा पेटण्यास कारणीभूत ठरला आहे.हा वणवा बडव्यांना होरपळूनच शांत होईल असेच विद्यमान संकेत आहेत.जातीवंत बहुजनांनी बडव्यांची खेळी वेळीच लक्षात घेऊन सावध व्हावे असा प्रेमळ सल्लाही सामान्य शिवसैनिक देऊ पहात आहेत.